नीलाश्री सहजीवन वृद्धाश्रम

श्रीमती निला श्रीधर प्रथम, यांना समाज सेवेची हौस व आपल्या सारख्याच ज्येष्ठ वयाच्या व्यक्तींची आज कुटुंब व्यवस्थेत निर्माण झालेली गरज, डॉक्टर केदार अ. ओक या तरुण डॉक्टर चा प्रचंड उत्साह यातून वृद्धाश्रम तयार करण्याची संकल्पना सुचली. त्यात हि अनेकांनी आर्थिक हातभार लावण्याची तयारी दर्शवली, त्यामुळे मनोबल वाढले.

वृध्दाश्रमाचे स्थान :

ऐतिहासिक, पौराणिक पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्ग सुंदर चौल, तालुका – अलिबाग, जिल्हा – रायगड या गावी पाऊल टाकताच क्षणी सात्विक भाव उचंबळून येतील अशा भव्य व पवित्र श्री रामेश्वर मंदिर व श्री राम मंदिराचे परिसरात विश्वस्त मंडळ संचालित निलाश्री सहजीवन वृद्धाश्रम १ एप्रिल, २०१७ पासून कार्यरत असून वृद्धांना आपण आपल्या कुटुंबातच आहोत असे वाटावे असे वातावरण ठेवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

चौल हे गांव मुंबई – गोवा हायवेपासून वडखळ या ठिकाणा पासून  ३५ कि. मी. अंतरावर आहे. अलिबाग येथून चौल येथे जाण्यासाठी रेवदंडा – मुरुड एस. टी. बसेस मिळतात. तसेच खाजगी वाहने किंवा रिक्षाही उपलब्ध आहेत.

चौल गावाकडे जाण्यासाठी ६ सीटर व ३ सीटर रिक्षा व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. चौल हे ठिकाण मुंबई पासून १२५ कि. मी. व पुण्याहून खोपोली घाटा मार्गे फक्त १५० कि. मी. अंतरावर आहे.

वृद्धाश्रमाची वैशिष्ट्ये :

  • स्वतंत्र खोलीत २ वा ३ बेड्स व जोडून बाथरूम व टॉयलेट ची व्यवस्था उपलब्ध आहे.
  • उत्तम व रुचकर शाकाहारी भोजन.
  • रात्रं – दिवस वैद्यकीय सेवा उपलब्ध.
  • प्रेमळ सेवक वर्ग व काळजी वाहणारे व्यवस्थापन .
  • धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम.
  • दिवसभर पाण्याची सोय तसेच पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट प्युरिफायर, गरम पाण्यासाठी सौर उर्जेवर चालणारा वॉटर हीटर उपलब्ध आहेत.
  • केबल टी. व्ही. तसेच वैद्यकीय सेवा ( आठवड्यातून एकदा डॉक्टर भेट देऊन तपासणी करतात. )
  • धारिया वाचनालया सारख्या इतर सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दैनिक वर्तमानपत्रे हि उपलब्ध करून देण्यात येतात.
  • वृद्धां कडे येणाऱ्या पाहुण्यांची शुल्क घेऊन राहण्याची व भोजनाची व्यवस्था विश्रामधाम मध्ये केली जाईल.
  • नजीक च सर्व सोयींनी युक्त असा दवाखाना उपलब्ध आहे.

शुल्क आकारणी :

  • प्रवेश घेताना रु. १,०००/- प्रवेश शुल्क, वार्षिक वर्गणी रु. २०००/- व रु. ४०,०००/- डिपोझीट एकदाच घेतले जाईल.
  • प्रत्येक वृद्धांस दरमहा रु. ६०००/- वास्तव्य शुल्क आकारले जाईल.
  • सुरुवातीला हिंडू फिरू शकणाऱ्या वृद्धांस कालांतराने आजारी पडल्यास रु. ४०००/- किंवा आवश्यकते नुसार जास्त शुल्क नर्सिंग साठी स्वतंत्र द्यावे लागतील.
  • आजारपणामुळे तपासणी करावी लागल्यास डॉक्टारांकडून तपासणी, हॉस्पिटल मध्ये ठेवणे व नेणे, आणणे वगैरे खर्च व दैनंदिन औषधांचा खर्च प्रत्येक वृद्धास स्वतंत्रपणे करावा लागेल.
  • मासिक शुल्कात परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार संस्थेकडे राहतील.

भोजन व्यवस्था :

  • सकाळी – ६.०० वा. चहा, सकाळचा नाश्ता व चहा ८.३० वा.
  • दुपारचे भोजन – १२.३० वा.
  • दुपारचा चहा – ४.०० वा. आणि रात्रीचे भोजन – ८.०० वा. व रात्री ९.०० वा. एक कप दूध.

फोटो गॅलरी 

संपर्क

नीलाश्री सहजीवन वृद्धाश्रम

डॉक्टर केदार अच्युत ओक

मो. नं. +९१ ८८०५४२३४३३

ऑफिस मो.+९१ ९०७५७०८९६४